दिनेश झाडे
मुख्य संपादक
जिवती:-माझ्या मतदारसंघातील पहाडावरील बंजारा समाजबांधवांनी आज जिवती येथे मला अगत्याने बोलावून होळी उत्सव व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. या अविस्मरणीय उत्सवात मला होळीचा आनंद द्विगुणित करता आला; याचा आनंद खरोखरीच अवर्णनीय आहे.
वैभवशाली संस्कृती आणि परंपरेचा वारसदार असणारा निसर्गप्रेमी बंजारा समाज होळी उत्सव नेहमीच आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत आला आहे. आज देखील परंपरागत लेंगी नृत्य आणि विविध रंगाची उधळण करीत रंगोत्सव संपन्न झाला. या सणाच्या माध्यमातून बंजारा लोक आपली संस्कृती आणि परंपरा आजही त्याच उत्साहाने टिकवून आहेत, याचे अप्रुप वाटले. आयोजकांनी मला याठिकाणी बोलावून गोरमाटी परंपरेच्या या पुर्वापार चालत आलेल्या होळी उत्सवात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली; मी मनापासून आयोजकांचा आभारी आहे
.
या होळी उत्सवास माझ्यासमवेत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, शहराध्यक्ष राजेश राठोड, गोविंद टोकरे, विष्णु राठोड, गोवर्धन चव्हाण, साहेबराव राठोड, संतोष जाधव, विनोद नरेन्दुलवार, अजय खंदारे, रामा देवकते, बालाजी बिराजदार, मिलिंद राठोड, गोपीनाथ चव्हाण, जेतलाल चव्हाण, राहुल राठोड, फरीद शेख, दिगंबर आंबटवार, उखंडराव चव्हाण, सूर्यकांत खांडेकर, अनिल राठोड, मनमंत वारे, उल्हास जाधव, वामन पवार, राज बेल्लाळे,पंढरी वाघमारे, लक्ष्मण कांबळे, सचिन देवकते, प्रेम राठोड आदिंसह मोठ्या संख्येने बंजारा माता-भगीनी व बांधवांची उपस्थिती होती.


