✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक

मुंबई:-कंत्राटदारांचे ९० हजार कोटीची देयके प्रलंबित असल्यामुळे कंत्राटदारावर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. म्हणून सोमवार दि. १०मार्च २०२५ रोजी कंत्राटदारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली वर धडकणार असल्याची माहिती कंत्राटदार संघटेनेनी दिली. कांत्राटादारांनी कर्ज काढून व पदरच्या पैशानी सुरळीत कामे केलीत परंतु निधीअभावी ९० हजार कोटीची बिले प्रलंबित आहेत. याबाबत शासनाला वेळोवेळी निवेदन दिली , निदर्शने करूनही शासनाने बिले अदा न केल्यामुळे पार पडलेल्या कांत्राटदार संघटनेच्या बैठकीत सोमवार दि. १० मार्च ला मोर्च्याचे आयोजन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. सदर बैठकीला महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले , बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिआचे राज्य अध्यक्ष अनिल सोनावणे , राज्य मजुर फेडरेशनचे अध्यक्ष संचिव कुसाळकर , राज्य कांत्राटदार महासंघाचे कार्याध्यक्ष संजय मैद , महासचिव सुनिल नगराळे , खजीनदार निवास लाळ , राज्य विभागिय अध्यक्ष सुरेश कडु पाटील , सुबोद सरोदे , मंगेश आवळे ‘ प्रकाश पांडव , अनिल पाटिल यासह अनेक संघटनेचे पदाधिकारी हजर होते. गडचिरोली जिल्ह्यातही मोर्च्याची जयंत तयारी सुरु आहे.
