✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-काही लोकांनी रयतेचे राजे शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास लपवला असता म. ज्योतीबा फुलेंनी महाराज्याची समाधी शोधुन पाहिली शिवजयंती साजरी केली. अश्या महापुरुषांचे विचार आत्मसात करा. आज शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाजा बद्दल जो द्वेष पसरविला जातो तो खोटा आहे. कारण शिवाजी महाराज जातीभेद करीत नव्हते त्यांच्या सैन्यात मुस्लिम महार सुद्धा होते. शिवाजींच्या नावावर जे दंगली घडवू पाहतात त्यांना आधि प्रश्न विचारा आणि खरा इतिहास पुस्तके वाचून ओळखा अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन प्रा. जावेद पाशा कुरेशी अध्यक्ष भारतीय मुस्लिम समाज परिषद नागपूर यांनी जांब येथील शिवजयंती कार्यक्रमात केले. सावली तालुक्यातील जांब ( केरोडा ) येथील जि.प शाळेच्या पंटागणात पार पडला. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच वर्षाताई गेडाम , उदघाटक पो.पा उमाकांत चरडुके , तर प्रमुख पाहुणे शामंत गायकवाड , प्रकाश थोरात , भाष्कर धानफोले , चक्रपाणी निमगडे , गोपाल रायपूरे , प्रा. मुनिश्वर बोरकर , जिल्हेवार सर , रायपूरे सर. मिलिंद खोब्रागडे , महादेव लाकडे , पुण्यप्रेडीवार मॅडम , विलास हुलके ‘ राहुल पडगेलवार , मनोज गेडाम चक्रपाणी चुनारकर , मनोज मेश्राम , विलास हुलके , वंदना वडुले , आदि मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन अमित वाकडे तर आभार गजानन आलेवारी यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
