✍️मुनिश्वर बोरकर संपादक
गडचिरोली:-जुन्नर येथील आढावा बैठकीत मा.आमदार शरद सोनवणे यांनी मा.प्रा. डॉ अशोक ऊईके साहेब आदिवासी विकास मंत्री यांना अर्वाच्य भाषेत खालच्या पातळीवरील शिवीगाळ केली.मा आदिवासी डॉ अशोक ऊईके साहेब हे आदिवासी समाजातील पिएचडी झालेले उच्चविद्याविभूषित आदिवासी मंत्री असुन हा अत्यंत निंदनीय प्रकार त्यांचे सोबत घडत आहे त तर जुन्नर सारख्या आदिवासी बहुल भागातील लोकांबद्दल त्यांची किती घृणास्पद मानसिकता असू शकते हा प्रश्न आहे. अशा या मग्रूर लोकप्रतिनीधींना आदिवासींच्या मतांची गरज आहे पण त्यांची किंमत नाही हेच स्पष्ट होते.याबाबत आदिवासी समुदायात तीव्र नाराजी पसरली आहे.व सर्व स्तरातून टीका व निषेध केला जात आहे.अशा असभ्य गैर वर्तनी शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करावी व अॕक्ट्रासिटी अॕक्ट कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा अध्यक्ष कुणाल कोवे, प्रदेश सचिव माजी जि प सदस्य तथा आदिवासी सेवक कुसुमताई अलाम,सुनिता उसेंडी, विनोद मडावी, रोहिणी ऊईके रुपेश सलामे बादल मडावी यांनी मा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आदिवासी विकास मंत्री महोदयाचा अपमान म्हणजे संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे.असेही निवेदनात म्हटले आहे

