संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
सावली:-सावलीतील चिमढा गावाच्या अगदी सहा कि.मी अंतरावरील छोट्या नंदित तिघे मित्र गेले एकाला आंगोळीची ईच्छा निर्माण झाली त्यामुळे त्यांनी नदित उडी मारली परंतु तो वर आलाच नाही. दोघे मित्र भितीच्या आंताकाने घरी पळाले व रात्रौ पर्यंत काहीही न सांगता गप्पच राहीले.सावली तालुक्यातील चिमढा गावातील सोहम प्रमोद मोहुर्ले वय १५ वर्ष रा. सावली आपल्या दोन मित्रासोबत रविवारी चिमढा नदिवर गेले असता सोहमला आंधोळ करण्याची इच्छा झाली त्यामुळे तो नदिच्या पाण्यात उडी मारली परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यु झाला.त्यांच्या सोबत असलेले दोन मित्र घरी परतले परंतु सदर प्रकरणाची त्यांनी कुठेही वाचंता केली नाही. रात्रौ होताच सोहमच्या वडीलांनी शोधाशोध केला गावातील एका व्यक्तीने सांगीतले की तिघेजन नदिकडे जात होते. यावरून सोहम च्या वडीलांनी पोलीस स्टेशन सावली येथे रिपोर्ट दिला असता सावली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला व अधिक तपास सुरु असून सोहम हा रमाबाईआंबेडकर हायस्कुल सावलीचा विद्यार्थी १० व्या वर्गात शिक्षण घेत होता

