संपादक प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली
नागपूर:-संवादमित्र चित्तरंजन चौरे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हाच्या वतीने नागपूर शहरातील अंगणवाडी सेविकांना जादुटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण तसेच बुवाबाजी चमत्काराच्या प्रशिक्षणाला अंगणवाडी सेविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला . सदर प्रशिक्षणाला विभागीय उपायुक्त महिला व बालविकास नागपूर विभाग नागपूर यांच्या आदेशानुसार दोन प्रभागातील तब्बल 202 अंगणवाडी सेविकांनी आपली उपस्थिती नोंदवीली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेनसन्स सेंटर कामठी रोड येथील ऑडोटोरियम सभागृहात पार पडला.कार्यक्रमाला भारती मानकर, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आफिसर नागपूर ( नागरी) या अध्यक्ष म्हणून तर एस एस कुर्रेवार मॅडम ,महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.मंचावर रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य अंनिस,व विजया श्रीखंडे विभागीय सदस्य अंनिस हे पण उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मंगला गाणार यांनी संविधानाच्या उद्धिशीकेचे वाचन करुन केली.उत्तर नागपूर चे कार्याध्यक्ष देवानंद बडगे यांनी चळवळीचे गीत सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्षा मानकर मॅडम यांनी पाण्याचा दिवा प्रज्वलित करताच सेविकांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दिवा प्रत्यक्ष सेविकांनी समजून उमजून व तपासुन घेतला होता.तरीही तो पाण्याने कसा पेटला याचंच त्यांना अप्रुप वाटत होते.तद्नतर जादुटोणा विरोधी कायदा म्हणजे काय, त्याची अंमलबजावणी कशी करावी याचे डिटेल प्रशिक्षण प्रोजेक्ट वर चित्रमय रितीने प्रा डॉ सुनील भगत यांनी समजावून सांगितले. या प्रसंगी “जागरूकता संविधान की” हे प्रसिद्ध पथनाट्य अंनिस टिम ने सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर रामभाऊ डोंगरे व देवानंद बडगे यांनी बुवाबाजी चे वेगवेगळे चमत्कार सादर करुन अक्षरशः अंगणवाडी सेविकांना मंत्रमुग्ध केले.व कार्यक्रमाचे शेवटी चमत्काराची कारणमिमांसा पण सांगून सर्वांना अवगत केलं.या प्रसंगी ” मी सावित्री बोलते” हे एकपात्री नाट्यप्रयोग शोभा गौतम पाटील यांनी प्रस्तुत करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. “माणसाने माणसाशी मानसासम वागणे ” या समापण गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या सर्व गीतांना साज संगीत गोपी यादव यांनी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चित्तरंजन चौरे यांनी तर आभारप्रदर्शन इंजि. गौतम पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा .पुष्पा घोडके, दीप्ती नाईक, श्रृती मेश्राम,शिला डोंगरे, इंदू उमरे,रेखा सतदेवे, श्रद्धा सतदेवे, वर्षा सहारे, देवयानी भगत, सुषमा शेवडे,चंदा मोटघरे, पद्मा भीवगडे, अरविंद तायडे, उत्तम सालवनकर, आनंद मेश्राम, डॉ विकास होले, डॉ जयप्रकाश बोधी, चंद्रशेखर मेश्राम, अशोक राऊत,इंजि कमलाकर सतदेवे , अजय रहाटे, गौतम मघाडे, रमेश ढवळे,लहानू बनसोड,व पश्चिम नागपूर नागरी व जिल्हा नागपूर पश्चिम या प्रभागातील अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

