✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे शिवजयंती सोहळ्या निमित्त आयोजित “सांस्कृतिक कार्यक्रमाचा” उद्घाटन सोहळा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या शुभ हस्ते पार पडला. मार्गदर्शन करतांना माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले की रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे खरखरच शुरविर राजे होऊन गेले ‘ त्यांच्या जन्म दिनीच नव्हे तर सदैव स्मरणात शिवाजी महाराज ठेवा. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचेही मोलचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रमुख पाहुणे म्हणून रमेशजी बारासगडे व गावातील बहुसंख्येने शिवभक्त उपस्थित होते. अनखोडा गावकऱ्यांनी शिवजयंती कार्यक्रमात बहुसंख्य नागरिक उपसित होते.
