✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-बुध्दिष्ट इंटरनेशनल नेटवर्क , आरपीआय , भारत मुक्ती मोर्चा , राष्ट्रीय किसान मोर्चा , राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा व विविध संघटनांच्या वतीने दि. ९ एप्रील २०२५ बुधवारला दुपारी १२.०० वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून रॅली प्रदर्शन करून राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे . ईव्हीएम हटाओ , ओबिसींची जातनिहाय जनगणना करा , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दया , खाजगीकरण रद्द करून नोकरभरती करा , महापुरुषांचा वेळेवेळी अपमान करणे या विरोधात हे राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे
या आंदोलनात गडचिरोली जिल्हयातील जनतेने बहुसंख्येनी उपस्थित रहावे , असे बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी कळविले आहे.
