संपादक मुनिश्वर बोरकर.गडचिरोली
गडचिरोली:-सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कॉलनी गोकुळनगर गडचिरोली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुनिश्वर बोरकर आरपिआय जिल्हाध्यक्ष होते . प्रमुख पाहुणे भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , दशरथ साखरे आरपिआय उपाध्यक्ष , प्रमोद राऊत जिल्हा प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चा , माजी नगरसेवक तुळशिराम सहारे ,दामोधर शेंडे, हेमंत बारसागडे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा . मुनिश्वर बोरकर म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे डॉ . बाबासाहेब आबेडकर यांच्या विचाराचे खरे वारसदार होते . ते वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आयुष्यभर लढले . त्याच प्रमाणे बामसेफ जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी १६ ऑगस्टला मुंबईत भरपावसात मोर्चा काढला व म्हणाले की, यह आझादी झुठी है, देश की जनता भुखी है . तसेच दशरथ साखरे , प्रमोद राऊत, तुळशिराम सहारे, हेमंत बारसागडे यांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाला भिमराव गोंडाणे , कृष्णा भैसारे , दामोधर शेंडे , मधुकर लाटीलवार , कार्तिक निमगडे, रत्नमाला वाळके , अमिता भैसारे , वृक्षाली उंदिरवाडे , सुरेखा ठाकुर , वनिता मेश्राम , तारा बेतावार , कल्याणी गोंडाणे, निता उंदिरवाडे , सविता लाटीलवार , प्रियंका साखरे , अरुणा उंदिरवाडे , सगुणा मेश्राम उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन निशा बोदेले यांनी केले तर आभार प्रेमलता कान्हेकर यांनी मानले

