राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती

भद्रावती : स्थानिक निरंकारी मिशन शाखेच्या वतीने गवराळा वरदविनायक मंदिर येथील तलाव परिसरात दिनांक 23 फेब्रुवारी रोज रविवारी सकाळी 7.30 ते 10 वाजता च्या कालावधीत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान राबविण्यात आले.
या अभियानात स्थानिक निरंकारी मिशन शाखेच्या स्वयंसेवक बंधु - भगिनींनी उत्तम प्रतिसाद देत श्रमदान केले. यानिमित्ताने तलावाचा संपूर्ण परिसर रस्ते, झाडे स्वच्छ व सुशोभित करण्यात आले. दुपारी ए1 ते 2 वाजता या कालावधीत संत निरंकारी सत्संग भवन परिसराची साफसफाई सुद्धा करण्यात आली. या उपक्रमा निमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्र संचालन ममता घोगरे आणि आभार प्रदर्शन आभार प्रदर्शन शाखा प्रमुख किसन माटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप घोगरे,, नितीन मारबते, तारा कोटनाके, गीता घांगरे, स्वप्नील क्षिरसागर, सुनिता नांदे, साक्षी जोगी, अर्चना डावरे, सुचिता पिंपळकर, राधा डोये, वरारकर, गुड्डू मडावी, महेंद्र मोहुर्ले बंडू भोस्कर इत्यादी व संत निरंकारी सेवादल व माता भगिनी यांनी सहकार्य केले. दुपारी 3 ते 5 वा. या कालावधीत स्थानिक संत निरंकारी सत्संग भवन येथे सद्गुरु माता सुदिक्षा महाराज यांच्या महात्मा भालचंद्र बोरीकर यांच्या उपस्थितीत सतसंग आयोजित करण्यात आला सत्संग नंतर लगेच महाप्रसाद वितरण करण्यात आला. सर्व साथ संगत सेवा दल व भाविक भक्त बंधू भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
