संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-पाच – दहा मित्र दारुच्या अड्डयावर एकत्र जमले यात एक मित्र म्हणाला की दारूत पाणी न मिसळता जो ५ निपा दारू पेईल त्याला १० हजार रुपयाची होळ लावली यांतच एका तरुण मित्राने सदर पैंज ला आव्हान दिले व यातच त्या युवकाला जिव गमवावा लागला. कर्नाटक मधील कोलार जिल्हयातील २१ वर्षीय तरुण कार्तिक यांनी दारूत पाणी न टाकताच पाच बॉटला दारु पिण्याचे आव्हान आपला मित्र व्यंकट रेड्डी यांचेकडून आव्हान स्विकारले व पाणी न टाकताच कोरी दारू घटाघटा पिऊ लागला यातच त्याची प्रकृती बिघडली व त्याला मुलबागल येथील रुग्णालयात दाखल केले परंतु तो वाचु शकला नाही. यातच त्याला त्याचा जिव गमवावा लागला. पैंज लावणारा व्यंकट रेडी , सुब्रमनी व इतर सहा व्यक्तीवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. कार्तिक यांचे लग्न एका वर्षापूर्वी झाले होते.⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

