दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना – तालुक्यातील हेटी गावातील एकमेकाला बाजूला लागून असलेल्या दोन गुराच्या गोठ्याला मंगळवार दिनांक १३ रोजी दुपारी तीन च्या सुमारास अचानक रित्या आग लागली. या आगीत गोठ्याचे व तेथील साहित्याचे मोठे नुकसान झाले.
हेटी येथील प्रकाश विठ्ठल तुरानकर , प्रमोद विठ्ठल तुरानकर यांचे एकमेकाला लागून गुराचे गोठे आहे.यात अचानक लागलेल्या आगीत प्रकाश विठ्ठल तुरानकर यांच्या गोठ्यातील शेतीची अवजारे, अनाज , जनावराचा चारा, टिन पत्रे, इतर किरकोळ साहित्य असे एकूण दोन लाख ५५ हजार चे नुकसान झाले.तसेच गोठ्या लगत असलेल्या नागोबा निळकंठ तुराणकर यांच्या घराच्या पाईपलाईन जळाल्यामुळे तीस हजार रुपयाचे नुकसान झाले. प्रमोद विठ्ठल तुरनकार यांचे कुठल्याही साहित्याचे आगीत नुकसान झाले नाही. आगीची माहिती मिळताच कोरपना नगरपंचायत च्या अग्निशमन वाहनाने दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.
सदर घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी शीतल परतेकी व पोलिसांनी केला.





