✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-भाजपच्या अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा उद्या दिं. १ जुलै २०२५ रोजी मंगळवारी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

कार्यक्रमाची रुपरेषा- सकाळी ८ वाजता चामोर्शी रोड,जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित व्हावे.यानंतर सकाळी ८.३० वा. सेमाना देवस्थान मंदिरात पूजाअर्चा व सेमाना देवस्थान येथे “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण, त्यानंतर महिला रुगणालयात माणुसकीचा एक ध्यास अंतर्गत अन्नदान वाटप, रुग्णालयात फळवाटप, चामोर्शी मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमात अन्न धान्याचे किट वाटप व मूकबधीर विद्यालय मुरखडा व मतीमंद विद्यालयात शालेय बुक पेन चे वाटप असे विविध सेवाभावी उपक्रमांतर्गत वाढदिवस कार्यक्रम करण्यात येणार आहे. यासोबतच केक न कापता सायंकाळी ७ वाजता. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवारातर्फे अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराने या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

