संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-श्री संत गाडगे महाराज विद्यालय गडचिरोली येथील मुख्याध्यापिका एस . आर . गिरी यांचा सेवानिवृतीपर सत्कार करण्यात आला . संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला .

या सत्कार कार्यक्रमात मुख्याध्यापिका एस . आर . गिरी याना साडी व पुष्पगुच्छ देऊन गैरविण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक भोजराज कान्हेकर , जी .पी . बावनकुळे , आर एन . कराडे होते . तर प्रमुख उपस्थित एम . के . हजारे , एच. एस . गायकवाड , डब्ल्यू . बी . कृष्णाके, मिना मुरमुरवार तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस . आर. गिरी ह्या सेवानिवृत्त झाल्यानंतर जेष्ठ शिक्षक भोजराज कानेकर यांच्याकडे कारभार सोपविला.


