संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
चामोर्शी:-चामोर्शी तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायत हि मोठी ग्रामपंचायत असुन सुद्धा रेगडी ग्रामपंचायत नेहमीच कुलुपबंद असतो.
रेगडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसुन ते गडचिरोली येथे राहतात व महिन्यातून दोनदा रेगडी ग्रामपंचायत कार्यालयात हजेरी लावतात असे रेगडी ग्रामस्ताची तक्रार आहे. महत्वाची बाब अशी की येथे ग्रामसेवक अतिरिक्त दोन कर्मचारी कार्यरत असून सुद्धा ग्रामसेवकांच्या गैरहजेरीत ते कुलुपबंद करून आपल्या घरची कामे करण्यात मग्न असतात.
पावसाळा व शाळा सुरु झाल्या असुन कास्तकार व शाळकरी मुलांना प्रमाणपत्र , दाखले मागण्यासाठी ग्रामपंचायत कडे जातात परंतु गेटबंद रेगडी ग्रामपंचायत पाहुण आल्या पावले घरी परततात. नेहमीच गैरहजर राहणाऱ्या रेगडी ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

