✍️मुनिश्वर बोरकर संपादक
कुरखेडा:-शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे आश्वासन देणारे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे संजय गांधी निराधार योजनेचे थकीतअनुदान त्वरीत निराधार महिलांच्या खात्यात जमा करावे राशन दुकानातून मिळणारे धान्यअपंग निराधारांना घरपोच वितरण करावे पुरामुळे धान पिकाचे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्वरीतदेण्यात यावी आदि मागण्याचे निवेदन आरपिआय चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली रिपाईच्या एका शिष्ठमंडळांनी कुरखेडाचे तहसिलदार राजु धनबाटेमार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.कुरखेडा तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाच्या वेळी आरपिआय चे प्रा. मुनिश्वर बोरकर जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे उपाध्यक्ष टि.टी नंदेश्वर , डोमाजी नंदेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद सरदारे सचिव मोहनदास मेश्राम जेष्ठ नेता सदाशिव शेंन्डे युवा नेता संतोष खोब्रागडे मंगेश बन्सोड महिला अध्यक्षा लता सहारे दादाजी रामटेके मोरेश्वर राऊत मुरलीधर कसारे अनिल बांबोळे एम पी राऊत भुमेश्वर राऊत विलासीनी राऊत छाया जनबंधु सुलोचना सहारे प्रियंका जनबंधु संगिता राऊत रमाबाई जनबंधु प्रभाबाई सहारे गजभिये मॅडम आदि सहीत बहुसंख्य रिपाई कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

