✍️दिनेश झाडे मुख्य संपादक
सिंदेवाही :-महसूल सप्ताह अंतर्गत दिनांक 05/08 मंगळवार ला तालुक्यातील डीबीटी योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन
सिंदेवाही तहसीलदार व नायब तहसीलदार.मंडळ अधिकारी,तलाठी
यांनी सदर नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विविध लाभार्थ्यांना मिळणाऱ्या थेट आर्थिक सहाय्याची माहिती घेण्यात आली.सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट,देलनवाडी, नवरगाव, मोहाळी, नवेगाव लो.गुंजेवाही,व तालुक्यातील इतर गावातील लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन डीबीटी संबंधित आवश्यक ऑनलाईन प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात आले. गृहभेटी दरम्यान दिव्यांग व मतिमंद लाभार्थ्यांच्या अडचणींचा विशेष विचार करण्यात आला. अशा लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचा लाभ तातडीने देण्याकरता आवश्यक्य असलेले कागदपत्रे गृह भेट देऊन गोळा करण्यात आले. तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकांची केवायसी करून घेण्याबाबतची कार्यवाही देखील यानिमित्ताने करण्यात आली.यावेळी याउपक्रमात तहसीलदार संदीप पानमंद, नायब तहसीलदार रणजीत देशमुख, मंगेश तुमराम, श्रीमती सविता मडावी , मंडळ अधिकारी तोडसाम, गेडाम, निखाते,तालुक्यातील तलाठी तसेच महसूल सेवक (कोतवाल) उपस्थित होते.

