🚨आता शासकीय कार्यालयात संगणकावर तिन पत्याचा खेळ
💢भद्रावती पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी संगणकावर पत्ते खेळताना व्हिडीओ व्हायरल
रिपोर्टर ✍️ तालुका प्रतिनिधी राजेश येसेकर
भद्रावती : काहि दिवसापुर्वी एका मंत्राचा पत्ते खेळतानाचा व्हिडीओ व्हयरल झाला होता आता तर चक्क शायकिय कार्यालयात कर्मचारी खेळायला लागले आहे.भद्रावती शहरातील पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचा पत्ते खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. संबंधित कर्मचारी कार्यालयाच्या संगणकावर बसुन पत्याचा खेळ खेळताना दिसुन येतो. एका युवकाने हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून समाजमाध्यमावर शेअर केल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय कार्यालयातील अशा वर्तनाबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असुन संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

