गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-भामरागड येथील एका निवासी शाळेच्या प्राचार्याने शाळेतील काही मुलीचे लैगिंग शोषण करीत होता. अश्या अश्लील कृत्य करणाऱ्या प्राचार्यांना भामरागड पोलीसांनी पकडून गुन्हा दाखल केला. ८ मार्च महिला दिनी प्राचार्य मालु नोगो विडपी वय ५० वर्ष यांनी काही मुलींना बोलावून त्यांची घेडछानी करीत होता. सदर माहिती अल्पवयीन मुलीनी वार्डन ला सांगीतले व आपल्या मातापित्यांना माहिती दिली असता दि. ११मार्च २०२५ ला मुलींच्या मात्यापित्यांनी भामरागड पोलीस स्टेशन गाठून रिपोर्ट दिला असता भामरागड पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनश्री सगने यांनी तात्काळ आरोपींना पकडले. कोर्टात हजर केले असता विद्यमान कोर्टाने तिन दिवश पोलीस कंस्टडी दिली त्यामुळे ठाणेदार सगने अधिक तपास करीत आहेत . जुलै २०२४ मधे प्राचार्य विडपी ह्याने मुलींची छेडछानी व विकृत व्यवहार केला होता परंतु खुद्द प्राचार्याने मुलींना धमकी दिली की कुणीही काही सांगायचे नाही अन्यता शाळेतून काढून टाकु , बलत्कार करीन , जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी सदर प्रकरण कुणालाही सांगीतले नाही. मात्र यावर्षी प्राचार्याचे अती झाल्यामुळे वार्डन च्या शर्तकतेमुळे मुलीच्या माता पित्यांनी रिपोर्ट दिली असता प्राचार्यावर धारा ७४ , ७५ (2) 35 (2) (3) व पोस्को अधिनियम धारा ८ ,10 , १२ , अन्वये भामरागड पोलिसांनी मामला दर्ज केला असुन अधिक तपास सुरु आहे. आरोपीला फाशिची शिक्षा व्हावी असी मागणी मुलींच्या माता – पिता सहीत गावकऱ्यांनी केलेली आहे.

