✍️कवडु गाताडे
कोरपना
कोरपना:-कोरपणा तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या येरगव्हाण येथे अंगणवाडी सेविकेची पद भरती करण्यात आली परंतु गावातील महिलांना डावलून बाहेरच्यांना संधी देण्यात आली कारण ग्रामपंचायत येरगव्हाण पेसा अंतर्गत असून झालेली अंगणवाडी सेविका पद भरती रद्द करण्यात यावी कारण गाव पेसा असल्यामुळे पेसा अंतर्गतच करण्यात यावी गावातील मूळचे रहिवाशी असून गावातील महिलांना संधी न दिल्याने बाहेरच्या संधी कशी का दिली जाते .
आणि अंगणवाडी सेविकेची पदभरती झालेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी व गावातील महिलांना प्राधान्य देण्यात यावी कारण आम्ही पूर्वीपासून त्या गावांमध्ये राहत आहोत आणि आमचा गाव पेसा अंतर्गत असून आमच्या आदिवासी महिलावर एक प्रकारचा अन्याय झाला आहे करीता झालेल्या अंगणवाडी सेविकेची पदभरती तत्काळ रद्द करण्यात यावी व पेसां अतर्गत अंगणवाडी सेविकाची पदभरती घेण्यात यावी पद भरती न घेतल्यास समस्त गवारीच्या वतीने आंदोलन करू आंदोलन करू असा इशारा समस्त गावकर्याकडून होत आहे

