✍️प्रविण गायकवाड
राळेगाव
राळेगाव:-पं स अंतर्गत पीएमश्री जि प उच्च प्राथमिक शाळा वरुड (ज) येथे खगोलशास्त्र प्रयोगशाळा उभारली गेली आहे. या प्रयोगशाळेचे उद्घाटन मा. केशव पवार गटविकास अधिकारी राळेगाव यांचे शुभहस्ते तर राजू काकडे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयश्री प्रशांत कडू शा. व्य. स. तर प्रमुख अतिथी सरपंच प्रियंका पेंदोर, लखाजी महाराज विद्यालय झाडगावचे प्राचार्य विलास निमरड,गुणवंत आडे उपाध्यक्ष शा. व्य. स. कवडू मरसकोल्हे उपसरपंच, मधुकर आडे, जयसिंग पवार, विलास निखाडे, संध्या नेहारे, प्रकाश पाल, वनिता मडावी, आरोग्य सेविका नगराळे मॅडम, अंगणवाडी सेविका निता चव्हाण, प्रेरणा संस्थेचे रोहनकर मॅडम ,योगेश राऊत उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून सहायक शिक्षक पदावरून वरूडचे रहिवासी असलेले श्रावणसिंग वडते सर हे सेवानिवृत्त झाले म्हणून पि एम श्री उच्च प्राथमिक शाळा वरूड जहांगीर व शाळा व्यवस्थापन समिती वरूड जहांगीर यांच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्य शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या शाळेचा विकासाचा आलेख कसा वाढतोय याबद्दल सागर धनालकोटवार केंद्र प्रमुख झाडगांव यांनी सांगितले.उद्घाटनप्रसंगी केशव पवार ग. वि. अ यांनी या प्रयोगशाळेचा उपयोग तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना होईल.
अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाला केंद्रातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे
प्रास्ताविक पि एम श्री उच्च प्राथमिक शाळा वरूड जहांगीर येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक उत्तम पवार सर यांनी तर सुत्रसंचालन सहायक शिक्षक कुणाल भगत सर यांनी केले..
कार्यक्रमाचे आभार जेष्ठ शिक्षक भागवत चौधरी सरांनी केले. हा उपक्रम आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उत्तम पवार सर, भागवत चौधरी, सुजित येंडे सर मृणालिनी महाजन मॅडम कल्पना लाभे मॅडम,प्रियंका पोकळे मॅडम व सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी,पालक, महिला पालक यांनी व विद्यार्थी बंधू भगिनीं उपस्थित होते.

