✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक

चंद्रपूर:- जिल्ह्यातील राजुरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग ३५३(बि) बामणी ते परसोडा रस्ते विकासाचे काम मोठ्या वेगात जि.आर.आय.एल कंपनी कडून दि.२९ नोव्हेंबर २०१७ केंद्रशासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या निर्णयानुसार महामार्ग विकास कार्यक्रमासाठी माती,मुरूम,दगड उत्खनन जलसंधारण विभागाशी सांगड घालून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत राबवीत असले तरी जलसंधारण विभाग उंटावरून शेळ्या राखीत या भागातील नाले,ओढे तलावातील चुकीचे पंचनामे स्थळ पाहणी न करता या भागातील भूगर्भात भविष्यात निर्माण होणारी पाणी टंचाई वनपर्यावरण प्रदूषण मंडळाच्या नियमाला तिलांजली देत पाषण उघडे पडे पर्यंत राजुरा कोरपना तालुक्यातील नाले पोखरुण जलस्त्रोत नष्ठ केल्याने या भागात पाणी टंचाई व नाल्यातील शेती सिंचनावर परिणाम होऊन शेतकऱ्याना उत्पादनाचा फटका बसला आहे या भागातील धामणगाव,देवघाट,आसन,तांबडी,हेटी, मुठरा, चंदनवाही,गौरी,घाटराई,कोरपना,जेवरा,तुलसी,अंतरगाव या भागातील नाले पोखरून संपूर्ण रेती,मुरूम,दगडाच्या नावावर सफाई करण्यात आली शासनाचा नाले खोलीकरण पाणीसाठा वाढून सिंचन व्हावा मत्स्यपालन रोजगार व भूगर्भात पाणी पातळी वाढावी हा उद्देश फसला असून कंपनी कडून पाणी संचयनाचे कोणतेच पर्याय राबविण्यात आलेले नाही उलट बोरगाव भागातील सिमेंट बंधारे फोडून रस्ते तयार करण्यात आले अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांचे अटी-शर्ती भंग करून मंजूर परिणाम ब्रास पेक्षा अधिक उत्खनन करून शासनाच्या अतिरिक्त उत्खननाचा स्वामित्वधन भरणा केला नाही रात्रोच्या अंधारात सूर्यअस्त नंतर अवैघ वाहतूक अवैघ उत्खनन केल्याच्या अनेक तक्रारी व पोलिसात देवून प्रथम फिर्याद दाखल केली मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेली वाहन सुपूर्द नाम्यावर तहसिल कार्यालयात जमा केले दंडात्मक कार्यवाही व वरिष्ठांचे आदेश नसतांना वाहन सोडून दिल्याचे घटना कोरपना तहसिल क्षेत्रात घडल्या या भागातील कुसळ,चनई,हातलोणी,रस्त्यावर अतिभार वाहनामुळे रस्त्याची गाळण झाली ठीक-ठिकाणी खड्डे पडले जलसंचयनाचे उपाय योजण्यात आलेले नाही प्रदूषणमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले मात्र अनेक तक्रारी असतांना खनिकर्म विभाग,महसूल विभाग चौकशी कडे दुर्लक्ष केले कुसळ-धानोली नाल्यातून ४२५० परिणाम ब्रास खोदकाम पंचनामा २८/०६/२०२३ ला करण्यात आला व खोदकाम साठी २०२४ पर्यंत कालावधी होती उपरोक्त संपूर्ण उत्खनन होवून सुद्धा परवानगी नसतांना २०२५ मध्ये अवैघ उत्खनन कंपनी कडून केल्या जात असून शासनाच्या कोट्यावधीचे गौण स्वामित्वधनला चुना लावीत केंद्र शासनाच्या दि.२९ नोव्हेंबर २०१७ च्या शासन निर्णयाच्या अट क्र.८ नुसार जि.आर इन्फ्रा कंपनीच्या खोदकाम व अतिरिक्त उत्खननाची संपूर्ण चौकशी तसेच पकडीगड्डम कालवा खोदकामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे सय्यद आबिद अली यांनी उपमुख्यमंत्री, जलसंधार मंत्री मंत्री,मा.श्री.आमदार देवराव भोंगळे,जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
