गडचिरोली – संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्याचे वेतन पथक अधिक्षक दिलीप मेश्राम सेवानिवृत झाल्याने अंदाजे सहा महिने झाले परंतु अजुनही स्थायी वेतन पथक अधिक्षक मिळत नसल्याने शिक्षकांचे कामे वेळेवर होत नाही अशी ओरड शिक्षकामधे सुरु आहे.विवेक पी. नाकाडे अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक हे अधिक्षक वेतन पथक म्हणुन अस्थानी काम पाहतांना दिसतात. त्यांचेकडे चार चार कार्यालयाचा भार असुन एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार सुरु आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग , जिल्हा परिषद अधिक्षक वेतन पथक , प्राथमिक शिक्षण विभाग अधिक्षक वेतन पथक असे च्यार – च्यार विभागाचा कार्यभार ते साभाळत असतात. माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन पथक कार्यालयात ते फोन केल्यानंतर येतात व फाईलच्या ढिगाऱ्यावर सह्या मारून ते मोकडे होतात.गडचिरोली जिल्ह्यासाठी विधान सभेचे तिन आमदार व विधान परिषदेचे एक आमदार असतांना सुद्धा स्थायी अधिक्षक वेतन पथक अधिकारी न मिळणे आश्चयाचीच बाब आहे असे म्हणावे लागेल की आमदार ,अधिक्षक वेतनपथक विवेक नाकाडे यांच्यावर मेहरबान आहेत

