संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
गडचिरोली:-आज दिनांक २७ चे सांयकाळी दोन टक्कर हत्ती ठाणेगांव ते वैरागड रोडवरील हातमोळ्या जवळ आले होते तर याच रात्रौ कुलभट्टी – बेलगांव मधे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे व घराचे नुकसान करून हत्तीचा कळप दि. २७ चे रात्रौ वैरागड – चामोर्शी वनखी च्या जंगलात आलेत व रात्रीच संजय खंडारकर वैरागड यांच्या अख्या शेती पिकाला पायदळी तुडविले व सदर शेतकऱ्यांची अथोनाथ नुकसान झाली हे दि. २८ सकाळी सदर शेतकऱ्यांच्या लक्षात आले.वैरागड – चामोर्शी परिसरातील शेतकऱ्यांची अथोनाथ नुकसान होणे हे नित्याचेच झाले आहे. खासदार – आमदार , Rfo पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन ‘ घे शिरणी राय गुपचुप ‘ अशा प्रकार वनविभाकडून सुरुअसून वैतागलेल्या वैरागड परिसरातील नागरिकांनी आज दि. २८ ला क्षेत्र सहाय्यक वैरागड व Rfo आरमोरी यांना निवेदनाद्वारे कळविले की , एक तर हत्तीचा बंदोबस्त करा अन्यता आमच्या जमिनी वनविभागाच्या स्वाधिक करा , अन्यता वैरागड वासाळा परिसरातील शेतकरी तिव्र आंदोलन करतील अशा ईशाराही सदर परिसरातील शेतकऱ्यांनी दिला असुन शासन व वनविभाग कोणती भुमिका घेतो ते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागुन असुन , रोज मरे त्याला कोण रडे असे तर वनविभागाकडून होणार तर नाही ना तात्पर्य एवढेच.

