कोरपना – विदेही सद्गुरु श्री जगन्नाथ महाराज यांच्या पालखी आगमन व मिरवणूक सोहळा कोरपना शहरात गुरुवार दिनांक ३ ला सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक ३१ मार्च ला तुकडोजी नगर येथील श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा मंदिर येथून मार्गस्थ झालेली पालखी तुकडोजी नगर , तांबाडी, गांधीनगर,तुळशी , कोडशी बूज, कोडशी खू, शेरज बूज,पिंपरी, शेरज खुर्द,लोणी , वणसडी ,पिपर्डा , बोरगाव खुर्द, कातलाबोडी आदी गावावरून प्रस्थान करत कोरपना शहरात पोहचणार आहे. या निमित्त पालखीचे भव्य स्वागत श्री सद्गुरु जगन्नाथ बाबा भक्त परिवार कोरपना तर्फे करण्यात येणार आहे.भाविकांचे दर्शनार्थ राममंदिर वार्ड नंबर ११ येथे ११ ते १२ वाजेपर्यंत पालखी थांबनार असुन पुजनानंतर त्यानंतर पुढे ही पालखी प्रमुख मार्गानि जाऊन गजानन मंदिर येथे भेट देऊन कन्हाळगाव कड़े प्रस्थान होनार असुन परीसरातील गावातून मार्गस्थ होऊन शनिवार दिनांक ५ ला परत तुकडोजीनगर येथील मंदिरात पोहचणार आहे. तेथे रामनवमी निमित्य विविध कार्यक्रम व ह.भ.प.किशोरजी महाराज यांचे प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कोरपना येथील पालखी मिरवणूक सोहळ्यात जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.