✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील धडक्याने सुरू असलेल्या बामणी राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग 353 बी या रस्ते विकासाची काम गेल्या दोन वर्षापासून धडाक्यात सुरू आहे यामध्ये अनेक अनियमित्ता व शासनाच्या उत्खनन धोरणाच्या नियमाला केराची टोपली दाखवीत नाल्यामधून रेतीसह दगड मुरूम खोदकाम केल्या एक जानेवारी 2022 पासून जोमात सुरू आहे मात्र शासनाने उत्खनन धोरण अटी शर्ती टाकून दिलेल्या नियमाला बाजूला सारीतमोठ्या प्रमाणात नाले खोल झाल्याने अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्याच्या प्रवाह भागात अनेक गावाच्या नळ योजनेच्या विहिरी असून पाणी पातळी तळाला गेली आहे यामुळे अनेक गावात मार्च अखेर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे या भागातील चनई मांडवा हातलोणी देवघाट कुसळ माथा धामणगाव अंतरगाव गौरी मुठरा पवणी चंदनवाई बामणवाडा कोरपना कन्हाळगाव हेटी शेरज रुपापेठ या गावातील पर्यावरण प्रदूषण नियम व जलसंधारण विभागाच्या चुकीच्या पद्धतीने खोदकाम झाल्यामुळे अनेक गावातील पाणी पातळी कमालीची भूगर्भात घालवली आहे केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्य शासनाने उत्खननाची परवानगी दिली असली तरी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य उत्खनन झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतकऱ्यांच्या सिंचनावरपरिणाम झाला आहे कंपनीच्या मार्फतीने पाण्याचे स्त्रोत बळकट करण्याऐवजी स्त्रोत नष्ट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे अनेक तक्रारी होऊन सुद्धा कंपनीच्या कामाला आवश्यक असलेले रेती दगड मुरूम मंजूर क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे अतिरिक्त महसुलाचा वसुली कंपनीकडून करण्यात आली नाही यामुळे स्वामित्व धनाचा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात झाला असून त्याचा फटका शासनाच्या तिजोरीवर झाला आहे अनेक ठिकाणी पाणी स्त्रोत नष्ट झाल्यामुळे शेतीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे रस्ते विकास कामाच्या धुळीच्या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे कंपनीच्या सामाजिक दायित्वनिधी अंतर्गत कुठल्याही विकास कामाला प्राधान्य देण्यात आलेले नाही अनेक वेळा गेल्या दोन वर्षात वाहने जप्त करण्यात आली कोरपना तहसीलमार्फत काही वेळेस दंड व कारवाई करण्यात आली मात्र अनेक वेळा पोलिसांनी व महसूल विभागाने जप्त केलेले वाहन वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश झाले नसताना तत्कालीन तहसीलदार व्हटकरयांनी रात्री पकडलेले वाहन सूर्य उगवतास सकाळी सोडून दिल्याचेघटना यापूर्वी घडली तसेच पकडी गड्डम जलाशयाच्या मुख्य कालवा नियमबाह्य उत्करन करून कोट्यावधी रुपयाचे पूरनियंत्रकभिंत नष्ट करून त्या ठिकाणी असलेले मुरूम रीतीचे उत्खन करण्यात आले होते याबाबतची कोरपणा पोलीस मध्ये एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आलामात्र ती कारवाई थंड अवस्थेत असून कंपनीच्या नियमबाह्य कामाचे अनेक वाभाळे पुढे आले आहे असे असताना मात्र अनेक भागातील तलावाचे उत्खनन तर काही ठिकाणी रेकार्ड वर तलाव नसता तलाव दाखवून खोदकाम करण्यात आले होते विशेष मात्र हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामध्ये सूर्यास्तानंतर उत्खनन करू नये असे स्पष्ट आदेश असताना अनेक वेळा रात्रीच्या बारा ते दोन या वेळेत जप्तीचे कारवाया करण्यात आले होते मात्र कंपनीच्या मजुरीने वाहने जप्त होऊन सुद्धा कोणताच परिणाम झालेला नाही दुसरी बाबी परिवहन वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन करत धुळीचे कण माती उघडं कळत वाहतूक करण्यात येते अनेक राज्यातील वाहन या ठिकाणी कंत्राटदार जी आर आय एल या कंपनीकडे असून त्यांचे फिटनेस रोड टॅक्स व नियमाप्रमाणे वाहनाचे कागदपत्र आहे की नाही याबाबत शंका असून अनेक पर राज्यातील वाहनांचा वापर या ठिकाणी कंपनीकडून केल्या जात आहे याबाबत परिवहन अधिकारी यांनी संपूर्ण वाहनांची तपासणी व चौकशी करणे आवश्यक आहे तसेच पारडी कन्हाळगाव ठिकाणावर वाळूमिश्रीत रेती मुरूम दगडाची साठवणूक पावसापूर्वी करण्यात आली होती त्याचा देखील वापर हेराफेरी या ठिकाणावर त्या ठिकाणी करण्यात येत आहे ज्या ठिकाणची मान्यता आहे त्या ठिकाणी खोदकाम न करता अनेक ठिकाणी मिळेल तिथे उत्खनन करण्याचा सपाटा कंपनीकडून सुरू आहे दि 6 एप्रिल 2025 रोजी रात्री दहा वाजता देवघाट नाल्याच्या धानोली गावालगत पोकलेन मशीन ने उत्खनन करूनसहा हायवा वाहनांमध्ये नाल्यातील दगड मुरूम शेती भरत असताना महसूल विभागाचे पथकाने नायब तहसीलदार चिडे यांच्यासह तलाठी व मंडल अधिकारी

पथकाने धाड मारून वाहन जप्त करून सहा हायवा वाहन तहसील कार्यालयात जमा केले तर पोकलेन मशीन गावातील पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द नाम्यावरदेण्यात आले कोरपना तालुक्यातीलही मोठी धडक कारवाई असून यापूर्वी झालेल्या दिरंगाई सारखे तरहोणार नाही ना अशी शंका नागरिकांना आहे कोरपणा गावातील नालीचे काम थांबल्यामुळे रस्त्यावर दूषित घाण पाणी वाहत असून कंपनीकडून नाली
बांधकामाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे तर अनेक ठिकाणी पाणी साठवणुकी करिता बंधारे दुरुस्तीची मागणी असताना कंपनी चाल ढकल करून लोकांची दिशाभूल करीत आहे यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून या भागातील धानोली कोरपणा हातलोणी चनई रस्त्याचे तीन तेरा वाजले असून दुरुस्तीकडे कंपनीने कोणतेच लक्ष दिलेले नाही त्याचबरोबर गेल्या दोन वर्षात मंजूर पेक्षा अधिक उत्खनन याबद्दल खनि कर्म विभाग व महसूल विभाग वसुलीची कारवाई करणार का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे

