✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
9421734792
गडचिरोली:-दि. १६ फेब्रुवारी २०२५ ला भारत मुक्ती मोर्चाचा कार्यक्रम सुधिर नाग राष्ट्रीय प्रचारक बामसेफ पश्चिम बंगाल प्रमुख मार्गदर्शनाखाली राजीव गांधी हाल गडचिरोली येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटक रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर हे होते. याप्रसंगी सुधिर नाग म्हणाले की , बहुजन समाज जोडो यात्रा संपूर्ण भारतभर सुरु आहे. आपल्याकडे शिक्षा , शस्त्र आणि संपत्ती नसती तर आपण गुलामच राहीलो असतो आज आपल्याकडे शिक्षा आहे परंतु संपत्ती नाही व शस्त्र म्हणजे मतदानाचा अधिकार आहे त्याचा सदुपयोग करावा. डॉ. आंबेडकरांनी आपणास शस्त्र दिले परंतु आपले शस्त्र दुसरीकडेच जाते. राजाचा मुलगा राजा म्हणून गादिवर बसायचा आता मतदाता राजा आहे तो अधिकार आपण सदसदबुद्धीने वापरला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे , धर्मानंद मेश्राम , डॉ. धर्मद्र धाकडे , तुळसिराम सहारे , सरपंच मनोहर पोटावी ,सामाजिक कार्यकर्ता ज्ञानेश्वर मुजुमकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. मनोज लोहे विभागिय प्रभारी बामसेफ पूर्व विदर्भ म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागृतीचा दिवा जळत ठेवा असा संदेश दिला शिकल्या सवरल्या पेक्षा अनपड गवार आपले दुश्मन कोण व दोस्त कोण ओळखतो यालाच जागृती म्हटल्या जाते. लोकशाहीची हत्या दररोज होत आहे. परंतु बहुजन समाज अजुनही झोपेतच आहे म्हणुन बहुजन समाजाला एकत्रित करण्याची आज गरज आहे. याप्रसंगी प्रा. मुनिश्वर बोरकर , गोपाल रायपूरे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमांचे संचालन बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , यांनी तर आभार बामसेफ चे जिल्हा सचिव प्रमोद राऊत यांनी मानले’ कार्यक्रमास, अमरकुमार खंडारे ‘ डोमाजी गेडाम ‘ शांतीलाल लाळे ‘ पुंडलिक शेन्डे , प्रमोद बांबोळे मनोज खोब्रागडे , दामोदर शेंन्डे ,मारोती भैसारे , नरेश बांबोळे , नरेंद्र शेंन्डे , रत्नघोष नानोरीकर , चोखोबा ढवळे ,सुनंदा बांबोळकर , लता लिहितकर , नानोरीकर मॅडम , अमिता भैसारे
. सहीत कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
