✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
गडचांदुर:-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल २०२५ ला ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर येथे सकाळी ८ : ३० वाजता वंदनेनंतर आदरणीय भंते कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते नामदेवराव लांडगे गडचांदूर यांचा सत्कार करण्यात आला

ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर त कोरपना जि चंद्रपूर येथे नामदेवराव लांडगे यांचा आदरणीय भंते कश्यप यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, निळी टोपी, निळा दुपट्टा, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संविधान आणि बाबासाहेबांनी सर्व भारतीयांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेल्या प्रकटपत्राचे पुस्तक देऊन मोठ्या सन्मानाने सत्कार करण्यात आला.
ऐतिहासिक बुद्धभूमी हे स्थळ जोगाई डोंगराच्या पायथ्याशी जंगलात असून गडचांदूर बसस्थानकापासून साडे तीन किलोमीटर अंतरावर आहे. नामदेवराव लांडगे यांचे वय ७४ वर्षांचे आहेत. यांचा उदरनिर्वाह मोलमजुरी असून ७४ वर्षे वय असूनही या वयात हे घरबांधणीचे मिस्त्री काम करत असतात. मागील तीन चार वर्षांपूर्वी बुद्धभूमी येथे जाण्यासाठी पुल आणि रस्ता नसताना तेव्हा पासून तसेच जंगली जनावरांची भीती न बाळगता हे नियमितपणे बुद्धभूमी येथे दररोज वंदनेला जात असतात. हे वंदनेला गेल्यावर तिथे वेळातील वेळ काढून श्रमदान सुद्धा करीत असतात. हा त्याचा नित्यक्रम बनला आहे.
बुद्धभूमी येथे नियमितपणे वंदनेस येण्याबद्दल मी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी विचारांचे असते श्री. लांडगे म्हणाले की बाबासाहेबांनी नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर आपल्या दीक्षार्थी सर्व बौद्ध बांधवांना दररोज नाही तर कमीत कमी आठवड्यातून एकदा दर रविवारी बुद्ध विहारात जाण्यासाठी सांगितले होते. मी अनुसूचित जातीच्या चांभार समाजातील आणि अध्याप पावतो दीक्षा घेतली नाही तरी बाबासाहेबाचा आदेश पाळण्याच्या प्रयत्नात दररोज वेळातील वेळ काढून कोणाची वाट न पाहता बुद्ध वंदनेस ऐतिहासिक बुद्धभूमी येथे वंदेनेस जात असतो. तसे अशोककुमार उमरे आणि देवरावजी भगत सोबतीला असतात. मी थकून भागून असलो तरी वंदनेस गेल्यावर माझ्यात तरतरीपणा येते. सुरवातीला आमच्या घरातील विरोध होता पण मी नियमितपणे वंदनेस जात असल्याने आता तोही विरोध राहिला नाही. मी सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की ऐतिहासिक स्थळाचे जतन करण्यासाठी आपणही आपल्या वेळातील वेळ दिला पाहिजे.
सदर सत्कार समारंभाचे औचित्य साधून बाबासाहेबांनी जगातील लोकशाहीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्वे असलेले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात सर्व भारतीयांनी सामील होण्यासाठी बाबासाहेबांनी आवाहन केलेले प्रकटपत्र अशोककुमार उमरे रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक यांनी भेट म्हणून दिले. तसेच रविकुमार ताकसांडे यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे छोटे पॉकेट पुस्तक भेट दिले.
सत्कार समारंभ कार्यक्रमाचे वेळी भंते कश्यप, सत्कार मानकरी नामदेवराव लांडगे, अशोककुमार उमरे, देवराव भगत, गौतम भसारकर, भिमराव भगत, रविकुमार ताकसांडे, रोशन मेश्राम, दशरथ डांगे, शैलेश लोखंडे इत्यादी उपस्थित होते.
