संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली.
नागपूर:-आजकाल सुशिक्षितातच अंधश्रद्धा बाळगली जात आहे हि शोकांतिका आहे. ज्या व्यक्तींनी अंधश्रद्धा बाळगली त्याचे आयुष्य संपले कारण अंधश्रद्धा हि जिवघेणी पद्धत आहे. छोटेसे ऑपरेशन असले तरी तिथे धागेदोरे चालत नाही तर तिथे डॉक्टरच चालतात. अंधारात भुत दिसतो म्हणणाऱ्यांना सांगु इच्छीतो की , मेलेल्या माणसाच्या डेथ बॉडीचा अभ्यास करणारे नवशिके डॉक्टरांना मात्र त्यांना भुत दिसत नाही. अश्या प्रकारचे मार्गदर्शन अनिसं कार्यकर्त्या रोशनी गायकवाड नागपूर यांनी अनिसं महिला परिषदेत केले. अंधश्रद्धा निर्मुलना साठी राज्यस्तरीय महिला परिषद नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर नविन इंदोरा येथे पार पडली. कार्यक्रमाचे उदघाटक सामाजिक प्रश्नाचे अभ्यासक रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिद्धार्थ गायकवाड उपायुक्त नागपुर तर प्रमुख अतिथी म्हणुन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग बाबासाहेब देशमुख , अनिसं केद्रिंय सदस्या ॲड. मुक्ता नरेंद्र दाभोलकर , नदिंनी जाधव पुणे , सुभद्रा देशमुख , केंद्रिय सदस्य रामभाऊ डोंगरे , नागपूर जिल्हाधक्ष चित्तरंजन चौरे , पुण्याताई घोडके आदि लाभले होते. या प्रसंगी मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की क्रोधापेक्षा करुणेला महत्व आहे तरच जिवनात शांती मिळू शकतो . परिषदेत परिसंवाद व संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या अनिसं कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातून अनिसंचे जिल्हा संयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर , लता भैसारे , लता लिहीतकर आदिनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन वर्षा सहारे प्रास्ताविक गौतम पाटिल तर आभार प्रा. पुप्पाताई धोडके यांनी मानले कार्यक्रमास गडचिरोली जिल्ह्यातुन प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली दशरथ साखरे , तुळसिदास सहारे , मारोती भैसारे , प्रेमदास रामटेके , बन्सोंड ,चोखोबा ढवळे , लता भैसारे , संघमित्रा उंदिरवाडे , लता रामटेके , नाजुक भैसारे , सतिश ढेंभुर्ण , सुमन उंदिरवाडे , ज्योती मेश्राम आदिनी महिला परिषदेत सहभाग दर्शविला तर अनिसंचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

