हर घर तिरंगा प्रमाणे हर घर संविधान राबवू शासनाचा जि.आर: अशोक घोटेकर चंद्रपूर गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली – हर घर तिरंगा चे आम्ही स्वागतच केले , आता हर घर संविधान राबवायचा आहे. तशा शासनाचा जि. आर. आहे. प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी राबवावा अश्या प्रकारचे मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते अशोक घोटेकर यांनी कॉमेक्स येथील चावडीवर संविधान जागर मोहीमे प्रसंगी केले. संविधान जागर मोहीमेत प्रमुख मार्गदर्शक अशोक घोटेकर चंद्रपूर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कृष्णदास गजभिये , किशोर तेलतुंबडे चंद्रपूर भारतीयबौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत , रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर . आरपिआय चंद्रपूर जिल्हाचे नेते गोपाल रायपूरे , सामाजिक कार्यकर्ता गौतम मेश्राम , बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव प्रा. गौतम डांगे हे होते. अशोक घोटेकर पुढे म्हणाले की संविधान जागर मोहीम जिल्हाधिकारी , शिक्षणाधिकारी , खासदार , आमदार यांनी जातीने लक्ष देऊन राबवायचे आहे. संविधान कुणीही नाकारू शकत नाही परंतु काहिंना संविधानाचे नाव घेतले तरीही काटे उभे होतात. आंबेडकरी जनतेनी संविधान जागर कार्यक्रम गावा गावात प्रत्येक समाजात घेतला पाहिजे , खासदार , आमदारांनी पुढे निवडून यायचे असेल तर संविधान जागर मोहीम राबविणे आवश्यक आहे. शासनाच्या जि. आर नुसार हर घर संविधान व संविधान जागर मोहिम राबविणे व जिल्हाधिकारी यांनी या सर्व घडामोडीकडे लक्ष पुरविले आवश्यक आहे. महिलांनी जास्त जागृत होवून संविधान जागर मोहिम राबवावी तर शिक्षण विभागाने याची प्रभावि अमल बजावणी करावी. कार्यक्रमाचे संचलन तुलाराम राऊत प्रास्ताविक गौतम मेश्राम तर आभार प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी मानले. संविधान जागर कार्यक्रमात मारोती भैसारे , डॉ. उज्चला शेंन्डे , संघमित्रा राजवाडे , दशरथ साखरे , रघुनाथ दुधे , डोमाजी गेडाम , प्रमोद राऊत , सुनंदा बांबोळकर , लता रामटेके , निशा बोदेले , देविदास बोरकर , कविता उराडे , प्रेमिला नान्होरीकर , सुमन उंदिरवाडे , लहु रामटेके , एस व्ही मेश्राम , प्रेमलता कानेकर , प्रेमदास रामटेके , मोरेश्वर निमगडे , चोखोबा ढवळे , नाजुक भैसारे , सतिश ढेभुर्णे , जैराम उंदिरवाडे , लवकुश भैसारे , प्रमोद ढोलणे , नेताजी मेश्राम , दिवाकर मेश्राम , दामोदर शेंडे आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अशोक घोटेकर यांनी उपस्थितांना भारत का संविधान च्या शंभर प्रती बिनामुल्य वाटप केल्यात.
