✍️दत्तात्रेय बोबडे
उपसंपादक
यवतमाळ:-येथे नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन संपन्न झाले.अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा सहसचिव काॅ.संजय भालेराव उपस्थित होते.अध्यक्षस्थानी काॅ.रामचंद्र गजभार होते.अधिवेशनात विवीध विषयावर चर्चा करण्यात आली.जुने सभासदांचे नुतनीकरण करुन नविन सभासद नोंदनी करण्यात आली.पुढील तिन वर्षाकरिता नऊ सदस्यीय तालुका कौंसिलची निवड करण्यात आली त्यामध्ये तालुका सचिव म्हणुन काॅ.किशोर कदम यांची,सहसचिव काॅ.अशोक पारधी,सहसचिव काॅ.शरद मासुळकर,शहर सचिव काॅ.जाफरभाई,कोषाध्यक्ष काॅ.लक्ष्मणराव खंडारे,किसान सभा तालुकाध्यक्ष काॅ.प्रदिप नगराळे,कौंसिल सदस्य काॅ.पि.जी.गावंडे,काॅ.किसनराव दोरखंडे,काॅ.ईकबालभाई,काॅ.शकर दोखंडे यांचा समावेश आहे.नविन कौंसिलने पुढील तिन वर्षाचा कृती कार्यक्रम आखला व अधिवेशनाने तो मंजुर केला.कार्यक्रमाला शहर व विविध गावातुन असंख्य प्रतिनीधी उपस्थित होते.संचालन काॅ.पि.जी.गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन तालुका सचिव काॅ.किशोर कदम यांनी मानले.
