✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

पेंढरी:-धानोरा तालुका अंतर्गत येत असलेला आदिवासी दुर्गम भागातील .ग्रामपंचायत चिचोडा येथे घरकुल बांधकामाबाबत ग्रामसभा आयोजीत करण्यात आली. यात जे निराधार आहे. ज्यांचे घर पावसामुळे घर पडले आहे. ज्यांच्याकडे स्वतःची पळीत जागा आहे. अश्या गरीब व्यक्तीनेच घरकुल मिळण्याकरीता अर्ज करावा त्यांनाच त्याचा लाभ मिळेल असे सरपंच यांनी ग्रामसभेत सांगीतले तर ग्रामसेवक सहारे म्हणाले की बऱ्याच नागरिकांनी घरटॉक्स भरला नाही त्यांनी वेळीच घरटॅक्स भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करावे. ग्रामसभेला सरपंच ‘ उपसरपंच , सदस्य व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
