संपादक मुनिश्वर बोरकर गडचिरोली
सिरोंचा:-महसुल विभाग व वनविभागाच्या सयुक्त विद्यमाने महसुल सप्ताह सिरोंचा तहसिल कार्यालयात तहसिलदार निलेश होनमोरे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त तहसिलदार एन. एच सय्यद नायब तहसिलदार मसराम निरिक्षक अधिकारी पारधी , माजी नगराध्यक्ष राजु पेदापल्ली , शंकर सेनिगारपु , मोरेश्वर बोरकर ‘ आदिच्या प्रमुख उपस्थितीत महसुल सप्ताह साजरा करण्यात आला. या महसुल दिना निमित्य विविध प्रकारचे प्रमाणपत्राचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. एकाच छताखाली विविध विभागातील प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्यामुळे लाभार्थांनी आनंद व्यक्त केला

