✍️राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी
वाशीम जिल्ह्यातील लोणी या गावचे शिवधर्म पाईक पंडित देशमुख यांनी भाच्याचे स्वतःच्या मुलाप्रमाणे पालणपोषण करून त्याच्या मुलीच्या जन्माचे केलेले जंगी स्वागत समाजासाठी आदर्शवत ठरले आहे.
स्त्रीला शुद्र माणून निर्माण केल्या गेलेल्या पुरुष प्रधान मनुवादी समाजव्यवस्थेत एकेकाळी मुलीचा जन्म हा नकोसा होता परंतु गेल्या पंचेवीस वर्षाच्या काळात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून स्त्री सन्मानाला परमोच्च स्थान असलेल्या आपल्या महान प्राचीन मातृसत्ताक शिवधर्माचे प्रकटन करून समाजामध्ये स्त्रिसन्मान जागृत केल्याने स्त्री भ्रूण हत्या कमी झाल्या, समाजात कन्या प्राप्तीचे विशेष आकर्षण व ओढ निर्माण झाली. असेच एक वाशीम जिल्ह्यातील लोणी येथील
मराठा सेवा संघाच्या चळवळीलां समर्पित झालेले शिव फुले शाहु आंबेडकर यांच्या समतावादी विचार धारेने प्रेरित असलेले शिवधर्म सेवक शिवश्री पंडित देशमुख यांनी अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या भाच्याचे स्वतःच्या मुलाप्रमाणे पालणपोषण करून त्याचा शिवविवाह करून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. भाचा निलेश ठाकरे व पत्नी निकीता निलेश ठाकरे या नव दाम्पत्याला नुकतेच २६ मार्च २०२५ ला कन्यारत्न प्राप्त झाले. शिवधर्माच्या आचरणाने समाजामध्ये शिवधर्म संस्कार विधी द्वारा समाज जागृती करणारे शिवसेवक पंडित देशमुख यांनी आपल्या भाच्याच्या कन्यारत्नाच्या जन्माचे स्वागत कुठलीही अंधश्रद्धा कर्मकांड जुन्या कालबाह्य रूढी परंपरा झुंगारून सत्यशोधक शिवधर्म पद्धतीने नवजात बालिकेचे केलेले स्वागत समाजासाठी आदर्शवत असल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे. शिवसेवक पंडित देशमुख गेल्या पंचेविस वर्षापासून शिवविवाह,गृहप्रवेश,.. आदी सर्व विधी शिवधर्म पद्धतीने करून समाज परिवर्तनाचे कार्य करत शोषण मुक्त समाज निर्मितीचे कार्य करीत आहे.दिवाळी सणाला आपल्या पत्नीरुपी खऱ्या लक्ष्मीचे पूजन करने अशा अनेकानेक उपक्रमातून समाजात आदर्श निर्माण करणारे पंडित देशमुख यांची समाजमनात आगळीवेगळी प्रतिमा असलेले आदर्शवत व्यक्तिमत्व आहे. त्यांना या मागचे कारण विचारले असता त्यांनी शिवधर्माचे तत्वज्ञान असल्याचे सांगितले, पुढे ते म्हणाले की आजच्या या पंचेविस वर्षाच्या काळात स्त्रियांची झालेली प्रगती, स्त्री भ्रूण हत्येत झालेली कमी, समाजाला मुलीच्या जन्माची लागलेली ओढ व आकर्षनाचे मुख्य कारण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून १२ जानेवारी २००५ ला जिजाऊ जन्मोत्सवी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टी या शिवतीर्थावर मातृसत्ताक शिवधर्माचे प्रकटन व शिवधर्माचे तत्वज्ञान हेच असल्याचे त्यांनी सांगितले.

