गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:-दिनांक 19 मार्च 2025 ला थोर इतिहास संशोधक, इतिहासकार प्राध्यापक मा.म. देशमुख यांचे नागपूर येथे निधन झाले त्यामुळे बामसेफ,भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ तथा प्रोटान तर्फे थोर इतिहासकार, इतिहास संशोधक,समाज सुधारक, निर्भिड प्रबोधनकार , प्रा. मा.म. देशमुख सरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अभिवादन सभेच्छा अध्यक्षस्थानी अमर कुमार खंडारे जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा गडचिरोली हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्ष मार्गदर्शनात सांगितले की प्राध्यापक मा.म. देशमुख सरांचे विचार हे बहुजनांना जागृत करण्यासाठी फार मोलाचे विचार होते त्यामुळे त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम उपस्थित सर्व लोकांनी केले पाहिजे या अभिवादन सभेच्छा निमित्याने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे अशोक गडकरी यांनी मा.म. देशमुख सरांसोबत आलेल्या संबंधाचा त्यांनी केलेल्या लिखाणाचा बहुजन समाजाला होणारा फायदा समजावून सांगितला.
या अभिवादन सभेला उपस्थित देवेंद्र डोहने, जितेंद्र रायपुरे ,विनोद ब्राह्मणवाडे , पुंडलिक शेंडे ,कल्पना लाडे ज्योती आत्राम यांनी अभिवादन पर मनोगत व्यक्त केले या सभेचे संचालन नरेश बांबोळे यांनी केले,प्रास्ताविक आनंद अलोने यांनी केले तर आभार प्रदर्शन यज्ञराज जनबंधू यांनी केले.या अभिवादन सभेला यशस्वी करण्यासाठी प्रा. अशोक वंजारी, जनार्दन ताकसांडे,खेमचंद इंदुरकर, डॉ.उज्वला शेंडे , खंडारे मॅडम,डोमाजी गेडाम, प्रेमदास रामटेके यांनी प्रयत्न केले. या अभिवादन सभेला अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

