✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-तिन दिवसापूर्वी महादवाडी गावातील तुळसिराम बांबोळे यांच्या जमा केलेला उळीद , तुरी कठाण मालाचे नुकसान करून लांजेडा मार्ग गुरवळा च्या जंगल येऊन मुडझा पुलकर मार्ग वैनगंगा नदि ओलांडून सामदा गावापर्यंत हत्तीचा कळप पोहचला होता परंतु तिथे जंगल नसल्यामुळे हस्तीचा कळप पुन्हा परतीच्या वाटेवर निघाला .
. .दिनांक ५ मार्च चे रात्रौ मसली गावात पोहचला व गावतील दोन – चार घराची मोडतोड केली रात्रौच गावकऱ्यांनी हत्तीला हाकलून
लावल्यामुळे आज पहाटेच्या सुमारास वाकडी गुरवळा जंगलात आलेत. गडचिरोली वनविभाग गाडीने गस्त घालून ड्रोन च्या सहाय्याने हत्तीचा कळप नेमका कुठे आहे याचा शोध घेत होते परंतु ड्रोन चा काहीही उपयोग झाला नाही शेवटी गडचिरोली वनविभागाची गस्त घालणारी गाडी एक कि . मी पोटेगांव रस्त्यावर थांबुन मार्निग वॉक करणाऱ्या जवळपास १०० लोकांचा रस्ता अडवून सर्तकतेचा ईशारा देत होते त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांची गोची झाली त्यांना घरी परतावे लागले. आता मात्र हत्तीचा कळप दिभना जेप्रा मार्ग परतिचा प्रवास करणार , हत्तीच्या आगमनाने पहाटे फिरणाऱ्या गडचिरोलीकरांमधे भितीचे वातावरण पसरले होते.

