✍️ मुनिश्वर बोरकर
संपादक
भंडारा:-कांग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष पद गेल्यामुळे व अध्यापही केंद्रिय कांग्रेसने त्यांना कोणतेच पद न दिल्यामुळे संध्यातरी ते आमदार म्हणुनच वावरत आहेत त्यामुळे संध्या ते आपल्या राहते गावी हल्ली मुक्काम सुकळी भंडारा असाच आहे. नानाभाऊने संध्या सुकळी , भंडारा येथे कांग्रेस कार्यकर्त्याच्या भेटीगाठी घेतांना दिसतात. प्रदेशाध्यक्ष पद गेल्यामुळे सुकळीत होणाऱ्या कार्यकार्त्याच्या गर्दीवर परिणाम झालेला दिसुन येतो. केंद्रिय काग्रेस ने त्यांना केंद्रात मोठे पद देण्याचे ठरविले होते परंतु संध्यातरी त्यांचेकडे कोणतेच पद दिलेले नाही. राज्यात गटनेता पद हे माजी विरोधी पक्ष नेता पद आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याकडे दिल्यामुळे नानाभाऊची गोची झाली आहे. संध्या ते हल्ली मुक्काम सुकळी भंडारा येथे कार्यकर्त्याच्या भेटीगाटी घेत आहेत.
