✍️प्रा. मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-कोळसेगट्टा येथे भगवान बिरसा मुंडा आदिवासी समाज संघटना पोतेपल्ली प्याच कोरसेगट्टा यांच्या वतीने सल्ला गागरा शक्ती स्थापना व कोया पुणेम गोंडी धर्म संमेलन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात गडचिरोली विधानसभा मतदार संघांचे आमदार डॉ मिलिंद भाऊ नरोटे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, जिल्हा संघटक शुभंकर चक्रवर्ती आदिच्या प्रमुख उपस्थितीत कोया पुणेम गोंडी धर्म सम्मेलन संपन्न झाला. याप्रसंगीआमदार डॉ. मिलिंद नरोटे म्हणाले की, आपले गोंड समाजाचे आराध्य दैवत क्रांतीविर बिरसा मुंडा विर बाबुराव शेडमाके ‘ आदि महान पुरुषांचे आदर्श आदिवासी बांधवानी ठेवले पाहिजे. अश्या गोंडी धर्म सम्मेलनातून आपणाला ऊर्जा प्राप्त होते. जल , जंगल जमीन हि आपल्या हक्काची आहे. त्याचे जतन व संवर्धन आदिवासी बांधवानी केले पाहिजे असे सांगीतले . कार्यक्रमास सदर परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
