✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
9421734792
गडचिरोली:-महाराष्ट्र शासनाच्या २७ योजना आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजनेत शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी ४ लाख रुपये दिल्या जाते’ बिरसा मुंडा योजना तर दिव्यांगा साठी १% रक्कम राखिव ठेवण्यात येते अश्या विविध योजनांचा लाभ अनु जाती जनजतीनी घ्यावा. गरजु लाभार्था साठी शासनाच्या अनेक योजना असुन सुद्धा सदर योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचतच नाही त्यामुळे जि.प व प.स च्या कर्मचाऱ्यांनी यांची माहिती गावागावात पोहचवावी जेणे करून गरजु लाभार्थ्यांना यांचा लाभ घेता येईल असे आवाहनही जिल्हाधिकारी अवि श्यांत पंडा यांनी योजना सामाजिक न्यायाच्या या प्रदर्शनी कार्यक्रमात केले. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अतंर्गत योजना सामाजिक न्यायाच्या कार्यक्रम व प्रदर्शनीचे उदघाटन पंचायत समिती गडचिरोली पंटागणात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे हस्ते पार पडले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य कार्यपालनाधिकारी सुहास गाडे ,जिल्हा समाज कल्याण विभागाचे प्रमुख चेतन हिवज , गडचिरोली पंचायत समितीचे बिडिओ अनिकेत पाटिल , जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव गडचिरोली आदि लाभले होते. याप्रसंगी सि ईओ गाडे म्हणाले की मुलांच्या शिक्षणापासून ते रोजगारा पर्यंतची माहीती समाज कल्याण विभागातर्फे सहकार्य केल्या जातो. याप्रसंगी दिव्यांग व्यक्ती मुकुंदराव उंदिरवाडे यांनी दिव्यागासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व अपंग कल्याण समिती गठीत करण्याबाबत विनंती केली. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव तर आभार संवर्गविकास अधिकारी अनिकेत पाटिल यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार व जि.प .प .स चे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

