✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
कोरपना:- आज दिनांक 28/2/2025 ला मौजा बेलोरा येथे मान. आमदार देवराव दादा भोंगळे यांचे जाहीर सत्कार करण्यात येणार असून भोंगळे परिवारातील ज्येष्ठ मंडळी यांचे पुढील पिढीला आपली ओळख व्हावी.या उद्देशाने स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नोकरी व व्यवसायानिमित्त भोंगळे परिवारातील बरेच आप्तगन हे दूर दूर पर्यंत गेलेले आहे. त्यांच्या भेटी गाठी होत नाही. माणसाजवळ मोबाईल इंटरनेट सुविधा सोशल मीडिया येऊन पोहोचलेला आहे तरीपण आप्तगण्याची भेट होत नाही . सर्व आपल्या गणगोत व नातेवाईकाची एकमेकांना ओळख व भेटी गाठी होईल या उद्देशाने या स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून भोंगळे परिवार बेलोरा तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथे वास्तव्यास आहे. भोंगळे परिवाराचे उगमस्थान बेलोरा हे गाव आहे अशी बोलले तरी चालेल फक्त जातीचे दाखले किंवा जात वैधता प्रमाणपत्र करिता काढत असताना पुराव्यासाठीच आपले गाव असे बेलोरा आहे असे व्हायला नको. आज बेलोरा गावाच्या चारी बाजूने डब्लू सी एल झालेली आहे त्यामुळे काही जणांना शेतीनिमित्त तर काही परिवारातील लोकांना नोकरी व धंदे निमित्त गाव सोडून जाण्याची वेळ आलेली आहे भोंगळे परिवारातील काही सदस्य आज घुगूस, चंद्रपूर ,वणी. कोरपना तसेच गडचांदूर राजुरा, वडगाव, मा. आमदार देवराव दादा यांचे मूळचे गाव बेलोरा हेच आहे. या स्नेह मिलन सोहळ्याच्या उद्देशाने सर्व भोंगळे परिवारात मोठ्या व लहान मंडळींची भेटी गाठी होतील हे एक विशेष राहील. आज आपण नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेरगावला जरी गेलो असले तरी आपलेच होते हाच एक आदर्श ठेवून भोंगळे परिवाराच्या स्नेह मिलन सोहळ्याचे व मा. देवराव दादा आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केलेल आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रमेशराव भोंगळे सरपंच ग्रामपंचायत मारेगाव कोरंबी राहणार आहे . तरी.सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त भोंगळे परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान सत्कार आयोजक समिती आणि श्री प्रदीप भोंगळे यांनी केलेले आहे.
