दिनांक :14 मार्च, 2025 रोजी दुपारी 12.00 वा. जिवती तांड्यावर होणार होळी साजरी.
समस्त समाज बांधव जिवती येथे कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन.
✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक
जिवती :-होळी हा सण भारतीय सणसमारंभात एक अतिशय महत्वाचा सण मानाला जातो. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. होळी म्हणजे सप्तरंगांची उधळण. मौजमस्तीचा रंग उधळत येणारा हा सण भारतात विविध राज्यात विविध समाजात, जमातीत वेगवेगळ्या स्वरुपात साजरा करण्यात येतो. होळी हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येणारा असतो होळीच्या दिवसी सर्व हेवे, दावे, राग, लोभ विसरून एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो. सारी दु:खे विसरून होळीच्या रंगात रंगून जातो.या समाजाने आजही तंत्रज्ञान युगात आपली संस्कृती, चालीरीती, रुढी, परंपरा जपलेली आहे. होळी म्हणजे बंजारा समाजाचा जीव की प्राण. गोरबंजारा हा होळीला जिथे असो, जसा असो त्या अवस्थेतही आपली होळी साजरी करीत आलाय. यातच त्याची आयुष्याकडे बघण्याची डोळस दृष्टी व त्यांना जीवनाचं मर्म कळलेलं असावं म्हणून तो दुःखातही सुखी जीवन जगत असतो. अशा बंजारा लोकांना सारं विसरून रंगात रंगवून नाचायला, गायला, लावणारी ही त्यांची होळी. बंजारा संस्कृती प्रमाणेच त्यांची होळी सुद्धा वेगळ्या स्वरूपाची आहे. बंजारा समाजाची होळी म्हणजे अवघ्या जगातला आगळा वेगळा रंगोत्सव, नृत्योत्सव, गीतोत्सवच म्हणावा लागेल.
यासाठी विधानसभा क्षेञाचे आमदार पहिल्यांदाच जिवती बंजारा तांडयावर दिनांक: 14 मार्च, 2025 रोजी दुपारी 12.00 वा. समाज बांधवांबरोबर होळी साजरी करणार आहे.
यासाठी जिवती तालुक्यातील समस्त समाज बांधवांनी जिवती येथे उपस्थित राहणेबाबत जीवती तालुकाध्यक्ष श्री दत्ताजी राठोड व भाजयुमो.चे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी अवाहन केले आहे.

