✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे 23 फेब्रुवारी 2025 रोजी 41 वा दीक्षांत समारंभ आयोजित केला गेला होता, याप्रसंगी माता वॉर्ड आंबेडकर वॉर्ड देसाईगंज येथील रहिवासी डॉ. संजय भास्कर मेश्राम यांनी आचार्य (Ph.D)पदवी अंगीकृत केला आहे. Bussiness Management या विषयात Commerce and Mangageme या Field मध्ये डॉ. संजय भास्कर मेश्राम यांनी आचार्य पदवी मिळविली आहे. “गडचिरोली जिल्ह्याच्या विकासातील आर्थिक समस्या व औद्योगिक स्थितीचे विश्लेषणात्मक अध्ययन ( कालखंड 2008 ते 2018)” या विषयावर त्यांनी अध्ययन केले होते. दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे आपले राज्यपाल मा. राधाकृष्णन सर, सर्वोच्य न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश मा.भूषण गवई सर, मा. कुलगुरू सर व इतर मान्यवर उपस्थित होते, या यशाचे श्रेय डॉ. संजय मेश्राम यांनी आपले वडील भास्कर मेश्राम( बुद्धवासी), आई विमल मेश्राम, मार्गदर्शक डॉ. गोंडाणे सर, डॉ. वर्षा सुखदेवे मॅडम, सन्माननीय गुरुजन मारोती जांभूळकर सर,जावई मा. अनिल बोरकर, मा. संतोष शेंडे सर, मा.सत्यवान रामटेके सर तसेच सर्व मित्र मंडळीना दीले आहे.
