✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-जगात असे अनेक अंद्धश्रध्दाळू लोक अंद्ध श्रद्धने भरबडत चालले आहेत. अंध्श्रद्धाळू माणसे अन्न आगीत टाकुन पुजा करतात तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीची माणसे माणसाच्या पोटाची आग विझवितात. होळी सन जरूर करा परंतु थोडासा बदल करून पर्यावरण पुरक पद्धतीने साजरी करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ढोल तास्यापेक्षा त्या दिवशी २४ तास अभ्यास करून पुस्तकी ज्ञान मिळवा तोच आंबेडकरांचा खरा अनुयायी होऊ शकतो. भुत भानामती अंगात येणे , सर्पदंश आदि विज्ञानाला अनुसरून उपाय करा धर्माची विधायक चिकित्सा यातुनच मानवी आयुष्य चांगल बनु शकतो अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्या मुक्ता दाभोलकर यांनी मेळाव्या प्रसंगी केले. अंधश्रद्धा निर्मुलन समिती गडचिरोली ची बैठक मुक्ता दाभोलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली तर प्रमुख अतिथी म्हणुन विभागीय सदस्या विजया श्रीखडे नागपूर , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य रामभाऊ डोंगरे , रिपाई नेते गोपाल रायपूरे , सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे , रिपाई नेते तथा संयोजक प्रा. मुनिश्वर बोरकर आदिंचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे संचालन गायक विजय शेंन्डे तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले. बैठकीला माजी जि. प सदस्य समय्या पसुला , भोजराज कान्हेकर ‘संजय गडाटे , गुरुदेव भोपये , तुळसिदास सहारे , मंगेश गायकवाड , दशरथ साखरे , राजेंद्र खोब्रागडे , डोमाजी गेडाम , परशराम बांबोळे , प्रेमदास रामटेके , भारत शेंन्डे , नरेंद्र शेंन्डे , श्रीरंग उंदिरवाडे , जैराम उंदिरवाडे , खेमदेव हस्ते , लवकुश भैसारे ‘ चांखोबा ढवळे , सतिश टेभुर्णे , बारसागडे , संघमित्रा उंदिरवाडे , लता रामटेके , प्रेमिला नान्होरीकर , लता भैसारे , सुषमा भडके , नलिनी दुधे , आदि सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. पोलीसांचा चोख बंदबस्त होता.

