✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली:-धानोरा – चातगांव महामार्ग गेल्या पाच महिनापासून सुरू असुन सदर मार्गावर धुळीचा जनु लोटच वाहतांना बघायला मिळत आहे. त्यामुळे सदर मार्गावर दुचाकी , फोरव्हिलर वाल्यांना जिव मुठीतच घेऊन चालावे लागते. सदर राष्ट्रीय महामार्गावरील गावातील घरावर , रस्त्यावर , झांडावर धुळच – धुळ बसलेली पहावयास मिळतो. सदर धुळीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. खोकला , खाज , गळा दुखणे आदि आजार सदर परिसरातील लोकांमधे दिसुन येतो. असे अनेक रुग्ण शोधग्राम रुग्णालय चातगांव येथे जातांना दिसतात. या रोडवर राष्ट्रीय महामार्ग सार्व. बांधकाम विभाग गडचिरोली च्या अनेक गाड्या सदर कामावर धावतात. मुरुम; रेती आणणाऱ्या ट्रकावर ताडपत्री दिसत नाही. कच्या रोडवर कधिही पाणी मारल्या जात नाही. त्यामुळे धुळीचा लोट वाहतांना दिसतो. या रस्त्यावरून येणाऱ्या टु व्हिलर व फोरव्हिलर धुळीमुळे लाल रंग मारल्यासारखे दिसतात दुसऱ्या दिवशी गाडी वॉशिंगला नेल्याशिवाय गत्यंतर नाही. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग सार्व. बांधकाम खात्यानी सदर बाबीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी आवागमण करणारे प्रवासी व नागरिक करीत आहे.

