🟧संगीता ठलाल यांनी पाठविली होती कविता
✍️मुनिश्वर बोरकर
संपादक
कुरखेडा:-भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात असलेली देशभक्ती, देशाला आपला कुटुंब मानणारे तसेच आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण करून देशाचे हीत ठेवून आपल्या कर्तृत्वाने जगात ओळख निर्माण केली आणि आज साऱ्या विश्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून ओळखले जाते. अशाच अजरामर कार्यावर व त्यांच्या जीवनावर आधारित हिंदी भाषेतील कविता “शीर्षक :-नरेंद्र मोदीजी” ,तसेच महिलांची व्यथा जाणून घरोघरी शौचालय व गॅस सिलेंडर दिले. या आधारित मराठी भाषेतील कविता शीर्षक “उज्ज्वला योजना” ह्या दोन कविता मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल जि.गडचिरोली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली होती. त्यांच्या ह्या दोन्ही कवितेची दखल घेत या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे निदेशक चंद्रेश सोना यांनी संगीता ठलाल यांना पत्र पाठवून या बाबतची माहिती दिली व पत्रातून हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच धन्यवाद मानले. संगीता ठलाल ह्या दुर्गम भागातील शेतकरी व गृहिणी महिला असून चौथ्या वर्गात शिकत असताना लिखाणाला सुरूवात केली. त्यांचे दैनंदिन सकाळ सदर विचारधारा सर्वपरिचित आहे. लिखाण विविध विषयांवर सुरू असते.आजपर्यंत त्यांचे अनेक मासिकात, बऱ्याच पुरवणीत, संपादकीय पानावर विविध वृतपत्रात सातत्याने समीक्षा, ज्वलंत विषयावरचे लेख, कविता प्रकाशित होत असतात. बऱ्याच पुस्तकांना शुभेच्छापत्र, प्रस्तावना लिहून दिले आहेत.
रानभाज्यांच्या जगात उपक्रम सुरु आहे. हा उपक्रम अत्यंत लोकप्रिय झालेला असून वाचक वर्ग वाढत आहेत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात, शाळा, महाविद्यालय व इतर ठिकाणाच्या कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती दिसत असते. त्यांनी आजपर्यंत उद्धाटक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विशेष अतिथी, वक्ता, परीक्षक म्हणून भुमीका पार पाडली आहे. त्यासोबतच त्यांनी गेली काही वर्ष झालीत अनेक सामाजिक उपक्रम सुध्दा राबवत आहेत. त्यांचे साहित्यातील भरीव योगदान व नि:स्वार्थ भावनेने केलेले सामाजिक कार्य बघून रेडिओ आकाशवाणी केंद्र नागपूर येथे त्यांची मुलाखत घेण्यात आली. आज दुर्गम भागातील असलेल्या लेखिका संगीता ठलाल यांना पंतप्रधान कार्यालय नवी दिल्ली येथून पत्र येणे म्हणजेच ही जिल्हा वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. या आलेल्या पत्राबद्दल संगीता ठलाल यांचे सर्वंच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

