✍️दिनेश झाडे
मुख्य संपादक

गडचिरोली – रयतेच्या संपूर्ण राज्यातील । माणसांना सोडाच परंतु रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशा आदेश देणारे ,ज्यानी जातीभेद न पाळता आपल्या आईला सती जाण्यापासुन रोखणारे रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज होत अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन रिपाईचे जेष्ठ नेते प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम गडचिरोली येथील विश्रामगृह येथे प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन आरपिआय नेते गोपाल रायपूरे , बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर , ओबिसी नेते गुरुदेव भोपये , देवाजी भैसारे आदि लाभले होते . कार्यक्रमाचे संचलन प्रमोद राऊत यांनी मानले. कार्यक्रमास एकनाथ नंदेश्वर , ईश्वर उंदिरवाडे , मारोती भैसारे , खेमचंद हस्ते , ईश्वर उंदिरवाडे , डोमाजी गेडाम ,नामदेव उंदिरवाडे , नाजुक भैसारे , जोगेश्वर साखरे , चोखोबा ढवळे ,सतिश ढेभुर्णे , लवकुंश भैसार ‘निशाताई बोदेले ‘ अरुणा उंदिरवाडे ‘ आदि सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
