✍️मुनिश्वर बोरकर
संपादक

गडचिरोली:-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन उपसभापती विलासभाऊ दशमूखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले. तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत. असे प्रबोधन विलासजी दशमुखे हे सांगत होते.कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी
या भव्य शिवमहोत्सवात बापूजी फरांडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली. पंकजजी येवले पोर्ला ,विशालभाऊ हरडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गडचिरोली,अरुणजी उंदीरवाडे सरपंच काटली, पार्वताबाई खेडेकर उपसरपंच, देवा भाऊ भोयर ग्रामपंचायत सदस्य, देवाजी नेवारे दरम्यान पोर्ला येथील शिव व्याख्यान श्रद्धाताई लडके उपस्थितीत होत. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
