⏯️आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हाडामधील सर्वच ओपन स्पेस विकसित करण्यासाठी स्थानिकांना केले आश्वस्थ
✍️राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर:- शहरालगत असलेल्या दाताळा हद्दीत नवीन चंद्रपूर म्हणून म्हाडा वसाहत प्रसिद्ध आहे. सर्व घटकातील नागरिकांना घर उपलब्ध व्हावीत या उद्देशाने म्हाडा वसाहत विकसित करण्यात आली आहे. चंद्रपूर क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांनी या वसाहतीच्या विकासाकरिता सातत्याने प्रयत्न केलेले आहे.. आज दिनांक 27 एप्रिल 2025 ला वसाहतीतील सद्गुण कॉलनी येथे 50 लक्ष रुपये किमतीचे समाज भवन बांधण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी उद्घाटक मा. आमदार किशोरजी जोरगेवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष दाताळा गावच्या उपसरपंच विजयालक्ष्मी नायर,ग्रामपंचायत सदस्य सुशांत शर्मा ,बंडू मते, मधुकर हिवरकर, प्रतिभा काळे, ताई डांगे, ज्योती किरमिरे, करण नायर, नामदेवराव डाहुले व प्रतिष्ठित नागरिक तसेचअनेक स्थानिक रहिवासीउपस्थित होते. सदर भूमिपूजन कार्यक्रमाचे संचालन गजानन मते तर आभार प्रदर्शन प्रकाश मोहुर्ले यांनी केले……..यावेळी परिजातक पार्क वसाहतीतील स्थानिक रहिवासी तथा श्री साई किराणा स्टोअर्स दाताळाचे संचालक श्री राजेंद्र गोरे यांच्या नेतृत्वात ओपन स्पेस विकसित करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले . तेव्हा आमदार महोदयांनी म्हाडा वसाहतीतील सर्वच ओपन स्पेस विकसित करण्याचे सूतोवाच केले. बऱ्याच कालावधीपासून वसाहती तयार झाल्या आहे.पण ओपन स्पेस च्या स्वच्छतेकडे म्हाडा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली. अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ओपन स्पेस असून सुद्धा छोट्या मुलांना खेळण्यासाठी पुरेसे साहित्य नाही, काही ओपन स्पेस मध्ये ओपन जिम लागलेले आहे. परंतु बऱ्याच ओपन स्पेस अजूनही अविकसित आहे, या बाबीकडे आमदार महोदयाचे लक्ष निवेदनाद्वारे वसाहतीतील नागरिकांनी वेधले. त्यावर सर्वच ओपन स्पेस विकसित करणार असल्यासंबंधीचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले. यावेळी निवेदन देताना राजेंद्र गोरे, राजेश चहारे ,अरविंद नौकरकर, सुभाष देशमुख, सिद्धार्थ डोंगरे, टी. एल. सदावर्ते, क्रीष्णा पांडे,दिलीप गेडाम, संजय ठेंगणे,सुशील कुबडे, अमोल मालेकर, गणेश भोयर, थेरे ,मोरे, रोगे, मालती गाते, भरणे इत्यादी नागरिक उपस्थित होते.⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

