गडचिरोली संपादक मुनिश्वर बोरकर
मुंबई:-शिवराज्याच्या सैन्यात मुसलमान नव्हेत या मंत्री नितेश राणेंच्या विधानामुळे महाविकास आघाडीतील व आघाडीतील नेत्यांनी भरपूर समाचार घेतला यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले की शिवराज्याच्या सैन्यात मुसलमान नव्हते हा मंत्री नितेश राणेचा दावा वादग्रस्त असुन राणेचा दावा कि नुकतीच हवा ? असे म्हटले ,राणेनी इतिहास वाचावा अनेक इतिहासकारांच्या पुस्तकात शिवराज्यात मुसलमान होते असे लिहल्या गेले आहे इतिहास खोटा नाही , इतिहास नष्ट करता येणार नाही असे बोलणे चुकीच आहे तर उबाठा चे खासदार संजय राऊत म्हणाले की देशात फाडणीचे बिज रोवण्याचे काम मोंदीच्या पिल्लावळांचा प्रयत्न होय , इतिहासाचे विकृतीकरण करून देश बरबाद करण्याचा प्रयत्न होय. शिवाजी महारांज्याचा तोफखाना प्रमुख कोण होता , अंगरक्षक कोण होते ,सदर वादग्रस्त मुद्दावर राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले की नितेश राणे पक्ष बदलविणारे नेते आहेत आता इतिहास बदलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जितेंद्र आव्हाड ‘ उदयराजे भोसले सहीत महाविकास आघाडी व विकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्री नितेश राणेच्या वक्तत्वावर चांगलेच संतापले.
