✍️दत्तात्रेय बोबडे
उपसंपादक
वणी:-प्लास्टिक पट्टीचा वापर करून एटीएम मशीन मधून पैस चोरण्याचा प्रयत्न करीत असताना शिरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली. सदर कार्यवाही मंगळवार११ मार्च रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील चारगाव चौकी येथे करण्यात आली.
सुशील वसंत तोडेकर (36) व नरेश रामदास घुगुल (33) रा. बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार चारगाव चौकी येथे दोन व्यक्ती हिताची कंपनीच्या एटीएम मध्ये प्लास्टिक पट्टी लावून पैसे काढण्याच्या प्रयत्न करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी याच एटीएम मधून 10 हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. एटीएम केंद्राच्या सीसीटीव्ही फूटेजवरून सदर बाबीची खात्री झाल्यानंतर आरोपी विरुद्ध कलम 305(1), 62 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी केली.
सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात API माधव शिंदे, PSI रावसाहेब बुधवंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल सूरज साबळे, अभिजित कोषटवार, कॉन्स्टेबल पंकज कुळमेथे, होमगार्ड आकाश टेकाम आणि पोलिस मित्र विक्की नागतुरे यांनी केली

